पशुपालकांनो, ‘या’ जातीच्या म्हशीचे संगोपन सुरू करा, घरी वाहणार दुधाची गंगा ; दीड लाखांपर्यंत असते किंमत

म्हैस पालन हा व्यवसाय भारतात केल्या प्रत्येक दशकापासून केला जात आहे

पशुपालन हा व्यवसाय शेती व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून केला जातो. 

पशुपालन शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय असल्याने शेतकरी बांधवांना यातून चांगली कमाई होते. 

मित्रांनो पशुपालनात गायींचे, म्हशीचे, शेळ्यांचे, मेंढ्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे संगोपन केले जाते

मित्रांनो आम्ही ज्या म्हशीविषयी बोलत आहोत ती म्हैस आहे जाफराबादी.

जाफराबादी म्हैस आपल्या मजबूत शरीर यष्टीमुळे चक्क वाघाला देखील हरवू शकते असे पशुपालक शेतकरी बांधव सांगत असतात. 

तसेच म्हशीची ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. तसेच भारतीय वंशाची ही म्हशीची जात भारतात पाळण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे जाणकार लोक नमूद करतात.

ही म्हैस वजनाने जड असून तिचे तोंड लहान आहे. 

या म्हशींचे वजन 800 किलो ते 1 टन पर्यंत असू शकते. या म्हशीचे शिंग वाकलेले असतात.